चिमुकल्यांनी घडवला आपला लाडका बाप्पा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

शाडू मातीच्या नावाखाली फायर क्ले, चायना क्लेपासून बनवलेल्या मूर्ती ग्राहकांना विकण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. 'सकाळ'ने या प्रकाराला वाचा फोडून खऱ्या शाडू मातीची ओळख करून दिली. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी मातीच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

औरंगाबाद : शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेला 'सकाळ' कार्यालयात रविवारी (ता. 20) सकाळी उत्साहात सुरवात झाली. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाला आकार दिला.

शाडू मातीच्या नावाखाली फायर क्ले, चायना क्लेपासून बनवलेल्या मूर्ती ग्राहकांना विकण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. 'सकाळ'ने या प्रकाराला वाचा फोडून खऱ्या शाडू मातीची ओळख करून दिली. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी मातीच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. 'सकाळ' कार्यालयात घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत मूर्तिकार नारायण डवले आणि प्रमोद डवले शहरभरातून आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. साच्यातून गणपती बनवणे, मातीच्या गोळ्यांतून मूर्ती घडवणे आणि ठोकळ्यातून गणपतीला आकार देणे, अशा तीनही प्रकारातून मूर्तिकला आत्मसात केली.

खगोलतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर, सेवाकर उपायुक्त चंद्रशेखर बोर्डे, ऍड. स्वप्नील जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यशाळेला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.