महानुभाव आश्रम रस्त्याचे काम जर्मन टेक्‍नॉलॉजीने 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

औरंगाबाद - महानुभाव आश्रम ते लिंक रोडचे काम जर्मन टेक्‍नॉलॉजीने करण्यात येत आहे. या कामाचे उद्‌घाटन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते रविवारी (ता. दोन) करण्यात आले. दोन किलोमीटर अंतराच्या या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मराठवाड्यात प्रथमच अशा प्रकारच्या मशीनचा वापर करण्यात येत आहे. 

महानुभाव आश्रम ते लिंक रोडपर्यंत वाहनांची मोठी वर्दळ आहे. वारंवार वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यातून वाट काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. या रोडचा वापर वाळूज, पैठण एमआयडीसीकडे जाणारी वाहने करतात. त्यामुळे नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आमदार शिरसाट यांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार जर्मन टेक्‍नॉलॉजीच्या असलेल्या फिक्‍स फॅम पेवर या मशीनद्वारे रस्त्याचे काम लवकर करण्यात येणार आहे. या रस्त्यावर ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, दोन किलोमीटरपर्यंत हा रस्ता आहे.  या वेळी तालुकाप्रमुख बप्पा दळवी, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता ऋषी खंडेलवाल, शाखा अभियंता भिवाजी जायभाये, रवींद्र बिंद्रा, उपअभियंता अंकुश गायकवाड, विजय सुबुकडे, अखिलेश्वर सिंग, सतीश निकम, राजेश साळे, सुनील काळे, सुदाम काळे यांची उपस्थिती होती.

काय आहे फायदा? 
मराठवाड्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात येत आहे. जर्मन टेक्‍नॉलॉजीच्या फिक्‍स फॅम पेवर या मशीनने काँक्रीटीकरण केल्यानंतर रस्त्याची फिनिशिंग लेवल ही इतर मशीनपेक्षा चांगल्या प्रकारे होते व एका दिवसात ३०० मीटरपर्यंत काम होते. या मशीनवर साधारणतः आठजण काम करतात.