मुलींच्या जन्मदरवृद्धीत औरंगाबाद तिसऱ्या स्थानी 

मुलींच्या जन्मदरवृद्धीत औरंगाबाद तिसऱ्या स्थानी 

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने राबवलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन दिल्याने मुलीच्या जन्मदरवृद्धीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. एवढेच नव्हे तर उद्दिष्टाच्याही पलीकडे काम केल्याने औरंगाबाद जिल्हा मुलींचा जन्मदर वाढवण्यात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. एक हजार मुलांमागे 929 एवढी मुलींची संख्या आहे. 

बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी सांगितले, की जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर दरहजारी किमान 880 पर्यंत वाढवावा, असे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. जिल्ह्यात "बेटी बचाव बेटी पढाव', "माझी कन्या भाग्यश्री' या योजना राबवून मुलींच्या जन्मदरवृद्धीसाठी प्रबोधन करण्यात आले. मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, मुलीच्या आहाराकडे लक्ष पुरवणे यासारखे उपक्रम या विभागातर्फे राबवण्यात येतात. परिणामी मुलींच्या जन्मदरात वाढ होऊन तो 929 पर्यंत पोचला आहे. या कामाबद्दल केंद्र सरकारनेही जिल्ह्यातील कामांची प्रशंसा केली असल्याचे श्री. कदम म्हणाले. 

मुला-मुलींतली तफावत कमी 
आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयातील आकडेवाडीनुसार मुलांच्या आणि मुलींच्या जन्मातील तफावत गेल्या चार वर्षांत कमी होत गेली आहे. 2013-14 मध्ये मुलांचा जन्मदर 24 हजार 614 तर मुलींचा जन्मदर 21 हजार 318 इतका होता, त्यात तीन हजार 296 ची तफावत होती. हे प्रमाण 2014-15 मध्ये मुलांचा जन्मदर 26 हजार 983; तर मुलींचा 24 हजार 778 इतका झाला. या वर्षांत दोन हजार 205 ची तफावत होती. 2015- 16 या वर्षात मुलांचा जन्मदर 29 हजार 508; तर मुलींचा जन्मदर 27 हजार 287 इतका असून यात 2 हजार 221 ची तफावत होती. 2016-17 मध्येमार्च अखेरपर्यंत मुलांचा जन्मदर 27 हजार 498; तर मुलींचा जन्मदर 26 हजार 136 इतका असून, दोन्हींतील अंतर कमी होऊन ही संख्या जवळपास एक हजाराने कमी होऊन 1 हजार 362वर आली आहे. 

चार वर्षांतील जिल्ह्यातील बालमृत्यूदर 
246  - 2013 - 14 

463  - 2014 - 15 

280  - 2015 - 16 

311 - 2016 - 17 मध्ये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com