औरंगाबादः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संघटनेचा संप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटीत) राज्यकर्मचारी चतुर्थश्रेणी मध्यवर्ती संघटनेचा दोन दिवसीय संप आज (गुरुवार) सुरू झाल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटीत) राज्यकर्मचारी चतुर्थश्रेणी मध्यवर्ती संघटनेचा दोन दिवसीय संप आज (गुरुवार) सुरू झाल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे.

हंगामी कर्मचाऱ्यांनाही या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामावर रुजू होऊ दिले नाही, त्यामुळे प्रामुख्याने ऑपरेशन थिएटर आणि सर्जरी विभागातील काम थांबले आहे. शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत हा संप दोन दिवस चालूच राहिल, असे संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष रवींद्र दाभाडे यांनी सांगितले.