धान्य वाटपाचा ऑफलाईन धडाका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

लाभार्थींच्या अंगठ्याचे ठसेच जुळत नसल्याने  ई- पॉस मशीनचा बोजवारा
औरंगाबाद - राज्यभरात पुरवठा विभागाने मोठा गाजावाजा करीत विभागातील बहुतांश रेशन दुकानांत ई-पॉस मशीन बसविले; मात्र आधार कार्ड संलग्न, तसेच लाभार्थींच्या अंगठ्याचे ठसेच जुळत नसल्याने ऑफलाईनच धान्य वितरणाचा धडाका लावला असून ई- पॉस मशीनचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

लाभार्थींच्या अंगठ्याचे ठसेच जुळत नसल्याने  ई- पॉस मशीनचा बोजवारा
औरंगाबाद - राज्यभरात पुरवठा विभागाने मोठा गाजावाजा करीत विभागातील बहुतांश रेशन दुकानांत ई-पॉस मशीन बसविले; मात्र आधार कार्ड संलग्न, तसेच लाभार्थींच्या अंगठ्याचे ठसेच जुळत नसल्याने ऑफलाईनच धान्य वितरणाचा धडाका लावला असून ई- पॉस मशीनचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

गोरगरिबासाठी वाटप करण्यात येणाऱ्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे सर्वश्रुत आहे. यास आळा घालण्यासाठी शासनाने बायोमेट्रिकचा सहारा घेतला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात ई- पॉस मशीन कार्यान्वित केल्या; मात्र अधिकाऱ्यांच्या कुचकामी धोरणामुळे धान्य वितरकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. 

उद्देश साध्य होत नसल्याने  या मशीन आता शोभेच्या वस्तू ठरत आहेत. केवळ २८.२८ टक्‍के कार्डधारकच आधारसोबत पडताळणी झाले असून, अन्य उर्वरित शिधापत्रिकाधारकांना ऑफलाइनच धान्याचे वाटप करण्याचे काम सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानातील धान्य लाभार्थींना न देता त्याची काळ्या बाजारात विक्री होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असल्याने यावर आळा बसावा म्हणून शासनाने पुरवठा विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्वच दुकानात ई-पॉस मशीन बसविण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर मराठवाड्यातील एकूण ११ हजार ४५४ पैकी ११ हजार १४९ दुकानांत तीन टप्प्यांत ई-पॉस मशीन बसविले; मात्र त्याद्वारे धान्य वाटप करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. 

जुलै महिन्यातील २५ तारखेअखेर विभागातील ११ लाख ९७६ शिधापत्रिकाधारकांनी ई-पॉस मशीनच्या माध्यमातून धान्याची उचल केली; मात्र  मराठवाड्यातील लाभार्थींचा आकडा हा जवळपास ५० लाखांहून अधिक आहे.

त्यामुळे ऑफलाइनच धान्य वाटप होत असल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी, काळाबाजार थांबला नसल्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

मराठवाडा

माजलगाव (जि. बीड) : शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  ...

12.09 PM

औरंगाबाद - नेत्यांची मनमानी आणि तालुकास्तरावर पोचलेल्या गटबाजीचा फटका काँग्रेसला ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बसण्याची शक्...

10.03 AM

औरंगाबाद - उभ्या ट्रकला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात लष्करातील जवान ठार झाला. भरत भास्करराव देशमुख (वय ३९, रा. चिकलठाणा, हनुमान...

09.39 AM