शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पास मंजुरी 

शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पास मंजुरी 

औरंगाबाद - केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत शहर परिसरात सहा ठिकाणी हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून, या प्रकल्पाला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. एक कोटी ६३ लाख रुपयांच्या विविध कामांचा हा प्रस्ताव असून, या कामांच्या निविदा दोन दिवसांत काढण्याच्या सूचना सोमवारी (ता.२३) नगरविकास विभागाने केल्या आहेत. 

शहर परिसरात ऑक्‍सिजन हब निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्याचबरोबर हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, त्यावर एक कोटी ६३ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून ५० टक्के, तर राज्य सरकारकडून २५ टक्के निधी मिळणार आहे. महापालिकेला २५ टक्के निधी यामध्ये टाकावा लागणार आहे. शहरात महापालिकेच्या मालकीच्या दोन एकरपेक्षा जास्त जागा आहेत. त्यातील सहा ठिकाणच्या जागांची निवड करण्यात आली आहे. सिडको, एन- दोनमधील रामनगर, तसेच आरेफ कॉलनी येथील दोन ठिकाणी, टाइम्स कॉलनी, मुकुंदवाडीतील येथील गणपती विसर्जन विहिरीचा परिसर, स्वामी विवेकानंद उद्यानासह आणखी एका ठिकाणी हरितक्षेत्र विकसित केले जाणार आहे. हरित क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्राप्त होणारा निधी याच कामांवर खर्च करण्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार आहे. तसेच प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नियुक्ती करावी लागणार आहे. लावण्यात येणाऱ्या झाडांपैकी ८० टक्के झाडे जगविण्याची दक्षता घ्यावी लागेल.

लवकरच निविदा निघणार
अमृत योजनेंतर्गत शहरातील सहा ठिकाणी हरित क्षेत्र विकासकामे करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. तसे आदेशही शासनाने दिलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com