औरंगाबादेत अडीच तास दमदार बरसला! 40 मिमी पावसाची नोंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

तीन वेळा बरसलेल्या मॉन्सूनपूर्वची शहरात एकूण सुमारे 56 मीमीची नोंद करण्यात आली होती.

औरंगाबाद : मान्सूनपूर्व पावासाने शहरात हजेरी लावली असली तरी मुळ मॉन्सूनच्या पावसासाठी औरंगाबादकरांना वाट पहावी लागली. बुधवारी (ता.14) शहरावर सुमारे अडीच तास बरसलेल्या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत 40 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. 

मे महिन्याच्या उकाड्यापासुन सुटका व्हायला शेवटच्या आठवड्यातच सुरुवात झाली होती. उन सावल्यांच्या खेळानंतर मे महिन्याच्या शेवटी आणि जुनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनपुर्व पावसाने हजेरी लावली. तीन वेळा बरसलेल्या मॉन्सूनपूर्वची शहरात एकूण सुमारे 56 मिमीची नोंद करण्यात आली होती.

मान्सूनचे वारे येणे लांबल्याने शहरात दुसऱ्या आठवड्यात पावसाने ओढ दिली होती. सुमारे तीन दिवस उशीराने औरंदगाबादेत दाखल झालेल्या मॉन्सूनचा पाऊस शहरावर जोरदार बरसला. सायंकाळी साडेपाचपर्यंत चिकलठाणा वेधशाळेत 40 मीमी पावसाची नोंद करण्यात आली.