जायकवाडीचे १८ पैकी १० दरवाजे केले बंद

चंद्रकांत तारु
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडे : ५ हजार क्युसेक विसर्ग; पाच वाजेनंतर दरवाजे बंद करण्याची शक्यता

पैठण (औरंगाबाद): येथील जायकवाडी धरणातुन १८ दरवाजे उघडून गोदापात्रात पाणी सोडण्यात आल्यानंतर आज (शनिवार) पाण्याची आवक मंदावल्याने १० दरवाजे बंद करण्यात आले. सध्या ८ दरवाजा मधून ५ हजार क्युसेक विसर्ग सुरू असून, आवक कमी होत असल्याने सायंकाळी दरवाजे बंद केले जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुरुवारी (ता. २१) धरणात नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. त्यानुसार १८ दरवाजे अर्धाफुट उचलुन दरवाज्याच्या सांडव्याद्वारे १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यानंतर त्यात पुन्हा पाच  हजार क्युसेक पाण्याची वाढ करुन पाणी सोडण्यात आले. आज पाण्याची कमी होत असलेली आवक विचारात घेऊन दहा दरवाजे दुपारी साडेबारा वाजता बंद करण्यात आले. सध्या धरणाचा पाणीसाठा ९८.०७ टक्के असून ही पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यात आली आहे.

धरणात सद्या वरील भागातून ६ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरु असून ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणाचे कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड, तहसीलदार महेश सावंत, सहायक अभियंता अशोक चव्हाण हे धरणावर तळ ठोकत परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत.

दोन्ही कालव्यातून १८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग
जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या या दोन कालव्यातून शेती सिंचनासाठी प्रत्येकी ९०० क्युसेक पाणी सुरु आहे. एकुण १८०० क्युसेक पाणी गोदापात्रात धरणातुन पाणी सोडल्यानंतर हे पाणी सोडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.