जयाजीरावच्या बंगल्यावर मराठा संघटनांची धडक 

राजेभाऊ मोगल
रविवार, 4 जून 2017

जयाजीरावांचा शोध सुरु 
किसान क्रांतीच्या समन्वयकाची बैठक ते आपल्या घरी घेतील. असा अंदाज लावून काही संघटना त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. या बैठकीत ते काय खुलासा करतात, संप मागे घेण्याचा निर्णय त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून घेतला, अशा अनेक प्रश्‍नांचे उत्तर त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आंदोलक शेतकरी त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, परिस्थितीचा अंदाज घेऊन ते स्वःताच गायब झाले असल्याचे त्यांच्या आंदोलनातील सहकारी सांगत आहेत.

औरंगाबाद - गुरुवारपासून ( ता. एक) सुरु असलेला शेतकऱ्यांचा संप परस्पर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर जयाजीराव सूर्यवंशी राज्यभर टिकेचे धनी ठरले आहेत. अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व किसान क्रांतीचे राज्य समन्वयक असलेल्या जयाजीराव यांनी रविवारी (ता.4) आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी औरंगाबादेतील समन्वयकांची बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र, स्वत: संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याने संतापलेल्या शेतकरी, मराठा संघटनांनी त्यांच्या बंगल्यावर धडक मारत घोषणाबाजी करीत टमाटे, भेंडी, बटाटे फेकून रोष व्यक्‍त केला. 

शेतमालास हमीभाव, कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या संपामुळे मोठी कोंडी निर्माण झालेली आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी वर्षा बंगल्यावर शनिवारी पहाटेपर्यंत बैठक घेतली. या बैठकीस जयाजीराव हजर होते. त्यानंतर या बैठकीत 70 टक्के मागण्या मान्य झाल्यामुळे संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी ज्या शेतकरी नेत्यांशी चर्चा केली त्यांच्यावर आपला विश्‍वासच नाही, ते फितूर झाले आहेत, असा संतप्त सवाल राज्यभरातून विचारण्यात आला. जयाजीराव यांच्यासह मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला हजर असलेल्या शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकाऱ्यांचे पुतळे जाळण्याचे प्रकार ठिकठिकाणी सुरु होते.

शेतकऱ्यांचा उद्रेक आणि संताप पाहून जयाजीराव यांनी शनिवारी (ता. तीन) माध्यमांशी बोलताना संप मागे घेण्याचा निर्णय आपण घाईत घेतल्याची कबुली देखील दिली होती. आपल्याला पश्‍चाताप होत असून शेतकऱ्यांनी संप कायम ठेवला तर आपण त्यांच्या सोबत असू असे सांगत आपल्या विरुध्दचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच रविवारी औरंगाबादेत बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, दुपारी उशीरापर्यंत बैठकच झाली नाही. त्यामुळे संतापलेल्या मराठा संघटनाचे प्रतिनधी अप्पासाहेब कुढेकर, संजय सावंत, रमेश गायकवाड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी जयाजीराव यांच्या बंगल्यावर धडक मारत घोषणाबाजी केली. 

जयाजीरावांचा शोध सुरु 
किसान क्रांतीच्या समन्वयकाची बैठक ते आपल्या घरी घेतील. असा अंदाज लावून काही संघटना त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. या बैठकीत ते काय खुलासा करतात, संप मागे घेण्याचा निर्णय त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून घेतला, अशा अनेक प्रश्‍नांचे उत्तर त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आंदोलक शेतकरी त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, परिस्थितीचा अंदाज घेऊन ते स्वःताच गायब झाले असल्याचे त्यांच्या आंदोलनातील सहकारी सांगत आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
संप मिटल्यामुळे काहींची दुकाने बंद: चंद्रकांत पाटील
लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले; 7 ठार
लंडन स्फोट : भारतीय संघाची सुरक्षा वाढविली
मुंबई-गोवा मार्गावर अपघातात 2 जण ठार
रेयाल माद्रिदने पटकाविले चँपियन्स लीगचे विजेतेपद
सांगली, कोल्हापूरला भूकंपाचा सौम्य धक्का​
नाशिकमध्ये शेतमालासाठी 'सुरक्षित कॉरिडॉर'​
'''महाराष्ट्र बंद' उद्या होणारच; संप मिटलेला नाही''​
'आश्‍वासने न पाळल्याने तावडेंनी राजीनामा द्यावा'​