जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ

चंद्रकांत तारु
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याबाबत औरंगाबाद येथे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. स्वामी आज सकाळी दहा वाजता बैठक घेणार आहे. अशी माहीती धरण सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. सद्यस्थितीत ३० हजार क्युसेक वेगाने पाणलोट क्षेत्रातुन पाणी दाखल होत असुन धरणाचा पाणीसाठा ९२ टक्के झाला आहे. धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याबाबत औरंगाबाद येथे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. स्वामी आज सकाळी दहा वाजता बैठक घेणार आहे. अशी माहीती धरण सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

हा निर्णय झाल्यानंतर सायंकाळपर्यंत पाण्याची आवक व पाणी पातळीत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन पाणी सोडले जाईल, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, धरण परिसरात पाऊस सुरु असुन वारा वाहत असल्याने धरणाच्या एकुण २७ वक्र दरवाजातून पाण्याच्या लाटा बाहेर पडत आहे. गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यापुर्वीच देण्यात आला आहे.