ज्वेलर्सचे दुकान फोडून  हजारोंचा ऐवज लंपास 

ज्वेलर्सचे दुकान फोडून  हजारोंचा ऐवज लंपास 

वाळूज - बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकातील महावीर धुमाळे यांच्या महावीर ज्वेलर्समध्ये चोरी झाल्याचे गुरुवारी (ता. १८) सकाळी उघडकीस आले. चोरांनी दुकानाचे लोखंडी गेट व शटरचे लॉक तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. 

धुमाळे हे नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे लोखंडी चायनल व शटरचे कुलूप तोडून दुकानातील सामान अस्ताव्यस्त करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले; मात्र चोरांना दुकानातील दोन्ही तिजोऱ्या फोडता आल्या नाहीत. त्यामुळे मोठे नुकसान टळले. गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आलेल्या अंबिलवादे या कारागिरामुळे ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलिस उपनिरीक्षक संतोष कसबे, लक्ष्मण उंबरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल रामदास गाडेकर, कारभारी देवरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या वेळी ठसेतज्ज्ञ आणि श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले. त्यांनी चोरांचा माग काढण्याचा प्रत्यत्न केला; मात्र अपयश आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com