औरंगाबाद : पत्रकारावरील लाठीचार्जबाबत हरिभाऊ बागडे यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

गांजा तस्करी करणाऱ्या महिलांवर कारवाई सुरू असताना वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा फुलंब्री तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी निवेदन देण्यात आले आहे.

फुलंब्री, (जि. औरंगाबाद) - गांजा तस्करी करणाऱ्या महिलांवर कारवाई सुरू असताना वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा फुलंब्री तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी निवेदन देण्यात आले आहे.

फुलंब्री तालुक्‍यातील नायगव्हान येथे गांजा जप्त करण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली.यावेळी पोलिसांच्या पथकावर तस्करी करणाऱ्या महिलांनी हल्ला केला. दरम्यान या प्रकाराचे वार्तांकन करण्यासाठी "दैनिक सामना'चे आळंद प्रतिनिधी प्रकाश पायगव्हान गेले होते. यावेळी दंगल नियंत्रण करणाऱ्या "दंगा काबू' पथकातील पोलिसांनी पायगव्हान यांच्यावरच लाठीचार्ज केला. या प्रकाराचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. पत्रकारावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रउफ शेख, पत्रकार नवनाथ इधाटे, पत्रकार धनंजय सिमंत, पत्रकार गणेश जाधव, पत्रकार सुभाष नागरे, पत्रकार नंदकुमार हापत आदींची उपस्थिती होती.