मोदी सरकारचा कारभार अभासी जगाप्रमाणेः कन्हैय्याकुमार

अनिलकुमार जमधडे
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा कारभार अभासी जगाप्रमाणे स्वप्नातील राजकुमारी प्रमाणे आहे. जगण्यामरण्याचे प्रश्‍न बाजूला ठेवून देशभक्तीच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात आहे. प्रश्‍न विचारणाऱ्याला लक्ष केले जात आहे. संविधान बाजूला ठेवून मनुस्मृतीला गळ्याला लावले जात आहे. मोदी सरकारचा हा दिशाभूल करुन निघालेला रथ रोखल्याशिवाय राहणार नाही, असा एल्गार जेएनयु विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्याकुमार याने केला.

औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा कारभार अभासी जगाप्रमाणे स्वप्नातील राजकुमारी प्रमाणे आहे. जगण्यामरण्याचे प्रश्‍न बाजूला ठेवून देशभक्तीच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात आहे. प्रश्‍न विचारणाऱ्याला लक्ष केले जात आहे. संविधान बाजूला ठेवून मनुस्मृतीला गळ्याला लावले जात आहे. मोदी सरकारचा हा दिशाभूल करुन निघालेला रथ रोखल्याशिवाय राहणार नाही, असा एल्गार जेएनयु विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्याकुमार याने केला.

प्रगतशिल लेखक संघ औरंगाबाद आणि लोकवाडमय गृह मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हैय्याकुमारच्या बिहार ते तिहार या प्रा. सुधाकर शेंडगे यांच्या अनुवादीत मराठी आवृत्तीचे प्रकाशन सोहळ्यात कन्हैय्याकुमारने भाजप सरकारचे वाभाडे काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भालचंद्र कानगो होते. यावेळी बोलताना कन्हैय्याकुमारने जेएनयु विद्यापीठातील मुळ घटनेचा उहापोह करत देशाद्रोही ठरवल्याचे सांगीतले. मी तर विद्यार्थी आहे, अभ्यास करत होतो, मात्र मला राजकारणात जाण्यास भाग पाडले, त्यामुळे राजकारणाच्या मार्गाने निघालो आता मात्र माघार नाही असे त्याने ठणकावून सांगीतले. देशद्रोहाचे आरोप लावल्याने खुलासा करणे तर भाग आहे, प्रत्येकाच्या कानात सांगू शकत नाही, म्हणून पुस्तक लिहणे भाग पडले. मी लेखक नाही, साहित्यीकही नाही, अगदी सहकारी मित्रांच्या मदतीने पुस्तक लिहल्याचे त्यांनी सांगीतले.

जीएसटी, नोटांबदीचा निर्णय घेतांना मोदींच्या सरकारने केलेले दावे फोल ठरले आहेत. जीएसटीमुळे व्यापारी हैराण आहेत, नोटाबंदीने देशातील 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. नोटाबंदीने दहशतवाद संपेल अशी दिशाभूल केली, अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेला हल्ला हे त्याचे ताजे उदाहरण असल्याचे कन्हैय्याकुमारने स्पष्ट केले.

गोभक्ती आम्हाला शिकवू नका
गोरक्षणाच्या नावाखाली देशभरात दलित, मुस्लिमांच्या हत्या केल्या जात आहेत. ज्यांनी कधी गाईचे शेण-मुत्र काढले नाही, ते लोक गोरक्षणाच्या गप्पा मारत आहेत. त्यांनी गाईचे शेण, गोमूत्र काढून दाखवावे. भाजपने तिकीट देऊन चोरांना पार्टीत घेतले, सध्या सगळे चोर घुसले, आरोप देखील कन्हैय्या कुमारने केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा?

पाचशे गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा आधार'!

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु; नागरिकांचे हाल

क्रांतिदिनी मुंबईत घुमणार मराठ्यांचा निःशब्द एल्गार; दहा लाखांहून अधिक नोंदणी

औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो: फडणवीस

खडसेंबाबतचा फैसला मुख्यमंत्र्यांच्या हाती

देश वाचवायचा असेल तर पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे

महेतांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी- पृथ्वीराज चव्हाण

Web Title: aurangabad news kanhaiya kumar attack on narendra modi government