औरंगाबादः कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून पदयात्रा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

महिलांच्या प्रश्‍नांवर मुख्यमंत्री मुग गिळून गप्प का? मोर्चेकऱ्यांचा सवाल

औरंगाबाद: कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, अद्यापही त्या निर्भयाला न्याय मिळाला नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता.13) राष्ट्रवादी कॉंग्रेस, महिला आघाडीतर्फे पदयात्रा काढण्यात आली. महिलांच्या प्रश्‍नांवरुन उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलेले असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुग गिळून का गप्प आहेत, असा प्रश्‍न मोर्चकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सकाळी दहा वाजेच्या सुमारास निघालेली ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. पीडितेला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवदेन देण्यात आले. या निवेदनात म्हटले, की दुदैवाची बाब म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात खटला सुरु असतानाही अद्यापही न्याय मिळालेला नाही. उशीराचा न्याय म्हणजे न्याय नाकारल्यासारखेच आहे. अत्याचाराच्या घटना सरकारला गंभीर वाटत नसून स्त्रियांच्या प्रश्‍नांबाबत हे सरकार संवेदनशील नाही. महिलाच्या प्रश्‍नावरुन उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलेले असतानाही सरकार अद्यापही उदासीन असल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, इसाक पटेल, मयूर सोनवणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता चव्हाण, डॉ. अनुपमा पाथ्रीकर, मेहराज पटेल, नगरसेविका अंकीता विधाते, विना खरे, मंजुषा पवार, सलमा बानो, प्रतिभा वैद्य यांच्यासह कार्यकर्त्या मोठ्या संख्येनी सहभागी होत्या.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017