औरंगाबाद: नाल्यात बिबट्या आढळला मृतावस्थेत

विकास पाटील
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

वाडी येथील भपकाऱ्या शिवारातील गट क्रमांक ५३, ५४ मधील नाल्यात पुर्ण वाढ झालेला बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. हा प्रकार शनिवारी (ता०२) दुपारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.

बनोटी (जि. औरंगाबाद) : बनोटीपासुन एक किलोमीटर अंतरावरील बनोटी वनपरिक्षेत्रातील वाडी (ता.सोयगाव, जि. औरंगाबाद) येथे एका नाल्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाडी येथील भपकाऱ्या शिवारातील गट क्रमांक ५३, ५४ मधील नाल्यात पुर्ण वाढ झालेला बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. हा प्रकार शनिवारी (ता०२) दुपारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वन विभागाचे अधिकाऱी घटनास्थळी पोचले असून, तपास करत आहेत.