सहकार चळवळीला अधिक गतिमान करा- जानकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

औरंगाबाद: शेतकरी, कामगारांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यांच्याकरीता लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कारखान्यानेही शेतकऱ्यांच्या विकासाला केंद्रबिंदू मानून सहकार चळवळ अधिक गतिमान करावी, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज (शनिवार) केले.

पैठण येथील श्री. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सन 2017-18च्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, कारखान्याचे चेअरमन तुषार पाटील शिसोदे, गोपाळराव आरखडे, भास्करराव राऊत, सुमित्रा राऊत, एम.बी. बोर्डे यांची उपस्थिती होती.

महादेव जानकर म्हणाले, दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन झाले. शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी कारखान्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन संचालक मंडळांनी कारखान्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करावे, असे यावेळी सांगितले.

प्रारंभी विधीवत पद्धतीने श्री. जानकर यांच्याहस्ते पूजन करून बॉयलरचे अग्नी  प्रदीपन करण्यात आले.