नगरसेवक होणार मालामाल; मानधनात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

माधव इतबारे
शनिवार, 15 जुलै 2017

औरंगाबादः राज्यातील महानगरपालिकाक्षेत्रातील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज (शनिवार) घेतला आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन दुप्पटीपेक्षा अधिक वाढवून तब्बल 25 हजार रुपये तर त्या खालोखाल "अ', "ब', "क' व ड वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना मानधन मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक मानधनवाढीचा पाठपुरावा सुरू होता.

औरंगाबादः राज्यातील महानगरपालिकाक्षेत्रातील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज (शनिवार) घेतला आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन दुप्पटीपेक्षा अधिक वाढवून तब्बल 25 हजार रुपये तर त्या खालोखाल "अ', "ब', "क' व ड वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना मानधन मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक मानधनवाढीचा पाठपुरावा सुरू होता.

वाढत्या महागाईनुसार नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, असे ठराव राज्यातील महानगरपालिकांनी मंजूर करून वेळोवेळी शासनाकडे पाठविले होते. सर्वांत श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या 2012 मध्ये मानधनात दहा हजार रुपयांवरून 25 हजार एवढी वाढ करण्याचा ठराव घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यानुसार पत्र देखील पाठविण्यात आले होते. मात्र नगरसेवकांच्या मानधनात वाढ झालेली नव्हती. दरम्यान नुकत्याच झालेल्या महापौरांच्या परिषदेत देखील याबाबतचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाने राज्यातील 26 महानगरपालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना सर्वाधिक 25 हजार रुपये मानधन मिळणार आहे.

औरंगाबादेत अडीच हजारांची वाढ
औरंगाबाद महापालिकेत निवडून आलेले 115 तर स्वीकृत पाच असे 120 नगरसेवक असून, त्यांना सात हजार 500 रुपये एवढे मानधन देण्यात येते. गेल्या दहा वर्षात त्यात वाढ करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे मानधनात वाढ करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत घेऊन तो शासनाकडे पाठविण्यात आला होता. औरंगाबाद महापालिका "ड' वर्गात असून, त्यानुसार नगरसेवकांना आता दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. याव्यतिरिक्त एक बैठकीचा शंभर रुपये असा भत्ता नगरसेवकांना देण्यात येतो.
असे असेल वाढीव मानधन

  • "अ' प्लसवर्ग 25 हजार
  • "अ' वर्ग 20 हजार
  • "ब' वर्ग 15 हजार
  • "क' व "ड' वर्ग 10 हजार

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

06.57 PM

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

06.09 PM

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

05.30 PM