औरंगाबाद शहरातील मॉलमध्ये कुंटणखाना 

औरंगाबाद शहरातील मॉलमध्ये कुंटणखाना 

औरंगाबाद - शहरातील प्रोझोन मॉलमधील दोन स्पामध्ये हायप्रोफाइल कुंटणखान्याचा गुरुवारी रात्री पर्दाफाश झाला. यामध्ये अकरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या ठिकाणी थायलंडच्या नऊ पीडित तरुणींसह स्थानिक दोन तरुणीही आढळल्या आहेत. 

प्रोझोन मॉलमध्ये डी स्ट्रेस हब आणि अनंतरा हे दोन्ही फॅमिली स्पा व मसाज पार्लर अडीच वर्षांपासून महागड्या मेंबरशिपवर सुरू होते. अनेक उच्चभ्रू वर्गातील नागरिक याचे सभासद असल्याचा संशय आहे. मसाज पार्लरमध्ये तीन हजार रुपये प्रवेश फी होती. आत गेल्यावर पाच ते पन्नास हजार असे वेगवेगळे दर होते. मॉलच्या समोरच्या भागात असलेल्या उच्चभ्रू वस्तीत या विदेशी तरुणी अलिशान फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांच्या मदतीला तीन महिला व्यवस्थापिका होत्या. 

या दोन्ही "स्पा'चा शशांक खन्ना हा एकच विभागीय व्यवस्थापक आहे. मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज, बॅग, नऊ पासपोर्ट, तीन लॅपटॉप, अकरा मोबाइल आणि भारतीय चलनातील साडेआठ लाखांसह काही विदेशी चलनही पोलिसांनी जप्त केले. आढळलेली रक्कम केवळ एका दिवसाचा गल्ला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

"एफआरओ'मध्ये नोंदी नाहीत 
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विदेशी मुलींकडे टूरिस्ट व्हिसा आहे. त्यामुळे त्यांना इथे काम करता येत नाही. शिवाय त्या शहरात राहतात, अशी कुठलीही नोंद नियमानुसार पोलिस आयुक्तालयातील विदेशी नागरिक नोंदणी (एफआरओ) कक्षात नाही. त्यासाठी आवश्‍यक असलेला अर्जही मुलींनी भरून दिलेला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com