'मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न कराल तर जागा दाखवू'

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

  • औरंगाबादेत फुट पाडणाऱ्यांच्या पुतळ्यांचे दहन
  • मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आक्रमक

औरंगाबाद : मुंबईत 9 ऑगस्ट क्रांतीदिनी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची सर्वस्तरावर जय्यत तयारी सुरु आहे. असे असतानाच काही जणांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करण्यासाठी परस्पर समिती गठीत केली. ही माहिती समोर येताच संतापलेल्या समाज बांधवांनी आज (गुरुवार) दुपारी येथील पुंडलिकनगर येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच फुटीरांच्या पुतळ्याचे दहन केले. मोर्चा होणारच, असा निर्धार व्यक्‍त करीत जर कुणी फुट पाडण्याचा प्रयत्न केला, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ऐतिहासिक मोर्चे काढून सरकारकडे निवेदने सादर केली. मात्र, गर्दीचा उच्चांक पार केलेल्या मोर्चाची दखल न घेतल्याने संतापलेल्या समाजाने 9 ऑगस्ट क्रांतीदिनी मुंबईत महामोर्चाची हाक दिली. या मोर्चाची दोन महिन्यांपासून तयारी केली जात आहे. विविध क्षेत्रात कार्यरत समाज बांधवांनी या मोर्चात सहभागी होणारच, या प्रकारचे नियोजन करीत आहेत. मंगळवारी (ता. एक) शहरात काढण्यात आलेली जनजागरण रॅली ऐतिहासिक ठरली. यामुळेच सरकारने काही जणांना हाताशी धरून फुट पाडण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचा आरोप क्रांती मोर्चातील समन्यवयक करीत आहेत. त्यातच काही जणांनी पाठपुरावा तसेच मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करण्यासाठीची समिती गठीत केली. ही माहिती पुढे येताच याप्रकाराने संतापलेल्या येथील समन्वयकांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच या फुटीरांच्या पुतळ्याचे दहन करीत घोषणाबाजी केली. वर्षभरापासून निवेदने आलेली असताना सरकारला का वेळ मिळाला नाही, असा प्रश्‍न उपस्थित कुठल्याही परिस्थितीत मोर्चा होणारच, अशी घोषणा देत जर, कुणी फुट पाडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना आम्ही सोडणार नाही, असा दमही आंदोलकांनी दिला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :