Maratha Kranti Morcha
Maratha Kranti Morcha

औरंगाबादेत 29 ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' 

औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे शांततेच्या मार्गेने काढूनही सरकारने केवळ आश्‍वासने देत समाजाच्या मागण्यांना बगल दिली आहेत. या आश्‍वासना विरोधात कुठलीही ठोस कृती कार्यक्रम हाती घेतलेला नाही. यामूळे मराठा समाजात सरकार विरोधात नाराजी आहे. यामूळे पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी औरंगाबादेत 29 ऑक्‍टोंबरला "मराठा महासभा' घेण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारी(ता.एक) शहागंज येथील गांधी पुतळ्या जवळ एक दिवसीय सत्याग्रह करण्यात येणार असल्याची माहिती मराठा महासभेच्या समन्वयकांनी बुधवारी(ता.18) पत्रकार परिषदेत दिली. 

मराठा समाजास आरक्षण, स्वामीनाथन आयोग लागू करा, ऍट्रॉसिटीचा होणारा दुरुपयोग थांबवावा, शेतकऱ्यांची सरसगट कर्ज माफी करण्यात यावी, के.जी.ते पी.जी मोफत शिक्षण, कोपर्डी प्रकरणातील आरोपी फाशीची शिक्षा द्यावी, आरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे काम सुरु करावेत या मागण्या समाजाने मोर्चे काढून मांडल्या. मात्र या आंदोलनाची दिशा भरकविण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी केला आहे. आतापर्यंत समाजाला दिलेल्या आश्‍वसना विषयी कुठलीच कृती केली नाही.

दुसरीकडे अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यावर गदा आण्ण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. यासह विविध मागण्यावर या महासभेत चर्चा होणार आहेत. 29 ऑक्‍टोंबर सिडकोतील जगतगुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात दुपारी बारा वाजता ही महासभा होणार आहे. यात राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, राजकीय नेते, समाजिक संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रामधील सर्वच संस्थाचालक, कारखानदारी व्यापारी व कामगार वर्ग यात सहभागी होणार आहे. सरकारच्या विरोधात वाढता असंतोषामूळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ही महासभा घेण्यात येत असल्याचेही समन्वयकांनी सांगितले. यावेळी रवींद्र काळे, रमेश केरे, प्रा.माणिकराव शिंदे, किशोर चव्हाण, सुनील कोटकर, अशोक वाघ, सतीश वेताळ, प्रशांत इंगळे, अंकत चव्हाण, परमेश्‍वर नलावडे, योगेश केवारे, भरत कदम गणेश वडकर, तुषार शिंदे, शिवाजी साळुंके, विजय म्हस्के, सुनील घुले, हनुमंत कदम, शुभम केरे, सचिन मिसाळ, राजेंद्र चव्हाण, तेजसच पवार, अक्षय पडूळ, निलेश ढवळे उपस्थित होते. 

ज्यांच्यावर विश्‍वास होता त्यांनीच विश्‍वासघात केला 
मराठा क्रांती मोर्चात सहभागी होत संभाजी राजे राज्यसभेचे सदस्य मिळवले. तर नारायण राणे व त्यांचा मुलगांनी मुख्यमंत्र्याकडे आपले मंत्रीपद मिळवत आहेत. या दोन नेत्याकडून समाजाला मोठी आशा होती.त्यांनी आमचा विश्‍वासघात केला आहेत. यातच राणे समितीने आरक्षणा विषयी सर्व्हेक्षण केले. त्यांनी महसुल विभागाच्या माध्यामतून सर्व्हेक्षण करणे गरजेचे असताना खाजगी कंपनीच्या माध्यमातून ते केले असल्याचा आरोपही समन्वयकांनी केला आहे. सध्या आरक्षणासाठी असलेल्या समितीवर नेमलेले महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना वगळण्यात यावेत. अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

अन्यथा राऊत यांच्या विरोधात आंदोलन उभारू 
शिवसेनच्या मुखपत्रातून संभाजी महाराजा विरोधात लिणाऱ्या संजय राऊत यांचा समाजातर्फे निषेध व्यक्‍त करण्यात येत आहे. संजय राऊत हे जाणिव पुर्वक मराठा समाजा विरोधात लिखाण करीत आहेत. मोर्चाच्या वेळीही अक्षेपार्य कार्टुन छापले होते. संजय राऊत यांना यांच्या विरोधात आंदोलन उभारणार असल्याचाही इशारा समन्वयकांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com