मराठा आरक्षणासाठी टरबुजाला नासक्‍या दुधाचा अभिषेक

अतुल पाटील
रविवार, 13 ऑगस्ट 2017

मुंबई येथील मराठा क्रांती मुक मोर्चानंतरही समाजाच्या कुठल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. यात समाजाची निराशा झाली आहे. तसेच मोर्चे गप्प ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला. यामुळे यापुढचे मोर्चे, आंदोलने, निदर्शने हे आक्रमकच असतील. असा इशारा सेनेतर्फे देण्यात आला. तसेच सरकारच्या विरोधात सेनेतर्फे मुख्यमंत्र्यांचे प्रतिक म्हणून टरबुजाला नासक्‍या दुधाचा अभिषेक घालण्यात आला.

औरंगाबाद : क्रांती चौकात टरबुजाला नासक्‍या दुधाचा अभिषेक घालून मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेचा छत्रपती उदयनराजे भोसले सेनेतर्फे रविवारी (ता. 13) निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच गाजर दाखवत चॉकलेट वाटली. 

मुंबई येथील मराठा क्रांती मुक मोर्चानंतरही समाजाच्या कुठल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. यात समाजाची निराशा झाली आहे. तसेच मोर्चे गप्प ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला. यामुळे यापुढचे मोर्चे, आंदोलने, निदर्शने हे आक्रमकच असतील. असा इशारा सेनेतर्फे देण्यात आला. तसेच सरकारच्या विरोधात सेनेतर्फे मुख्यमंत्र्यांचे प्रतिक म्हणून टरबुजाला नासक्‍या दुधाचा अभिषेक घालण्यात आला. मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांबाबतच्या भुमिकेचा निषेध म्हणून सेनेतर्फे मुख्यमंत्र्यांनाच गाजर दाखवत चॉकलेट वाटण्यात आली. सकाळी सव्वा दहा ते पावणेबारा दरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी केली. 

सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यावेळी किरण खैरे, मंगेश तोडकर, अजय देशमुख, अभिजीत तेजीनकर, उत्तम पवार, शिवाजी भुतेकर, मनोज मुरदाडे, तुषार जाधव, अज्जु उगले, कोमल औताडे, कोमल रंधे, लक्ष्मण नवले, दिपक भागडे, निखील शर्मा, अनिकेत मोझे, दत्ता पवार, दत्ता हुड, कृष्णा गांधिले, माधव पाटील, नाना आंबे यांची उपस्थिती होती.