औरंगाबाद: फुलंब्रीत अवैध वाहतूक होत असलेले देशी दारुचे 30 बॉक्‍स जप्त

नवनाथ इधाटे पाटील
गुरुवार, 6 जुलै 2017

औरंगाबाद-फुलंबी महामार्गावर गस्तीवर असलेल्या पोलिसांना गणोरी फाट्यावर एका बोलेरे गाडीत 30 देशी दारूचे बॉक्‍स सापडले असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

फुलंब्री (जि. औरंगाबाद) - औरंगाबाद-फुलंबी महामार्गावर गस्तीवर असलेल्या पोलिसांना गणोरी फाट्यावर एका बोलेरे गाडीत 30 देशी दारूचे बॉक्‍स सापडले असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

फुलंब्री येथील पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन व पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत हे बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद-फुलंब्री राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालीत होते. यावेळी गणोरी (ता. फुलंब्री) फाट्यावर पोलिसांना एक संशयित बोलेरो गाडी आढळली. गाडीची तपासणी केली असता गाडीत अवैध मार्गाने वाहतूक होत असलेले 30 देशी दारूचे बॉक्‍स सुमारे 72,000 रुपये किंमत व पाच लाख रुपयांची बोलेरो गाडी असा एकूण 5,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केला आहे. याबाबतीत दोन आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई, अ, 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये एक वकीलही आरोपी असल्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश बागल, जयसिंग नागलोट, शेख इलियास, श्री.आगळे,श्री.कसोदे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश होता.

मराठवाडा

नांदेड : जगातील सर्व भाषांमधून, त्यातील साहित्यांमधून आईचे महात्म्य आणि महत्त्व अगदी मोठमोठ्या लोकांनी मुक्त-कंठाने व्यक्त केलेले...

01.12 PM

औरंगाबाद - शहरात अंत्यविधीसाठी स्वर्गरथ, मोक्षरथ, वैकुंठरथ असतात; मात्र खेड्यांत असा कोणताही रथ नसतो. गावात मृतदेह खांद्यावर घेऊन...

10.33 AM

औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मेंटॉर म्हणून आता उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवार यांची राज्य शासनाने नियुक्‍ती केली...

10.33 AM