मराठवाड्यातील प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा

मराठवाड्यातील प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा

औरंगाबाद - भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकपदाची सूत्रे नागपूर येथून आलेले अजय गाडेकर यांनी यशवंत घोटकर यांच्याकडून सोमवारी (ता. २३) स्वीकारली. सहा महिन्यांतच दोन प्रकल्प संचालक मिळालेल्या या विभागाच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

औरंगाबादेत असलेल्या भरतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे मराठवड्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२, औरंगाबाद शहरातून जाणारे जालना रोड आणि बीड बायपाससारख्या रस्त्यांचे विस्तारीकरण, शहरालगतचा नवा बायपास, औरंगाबाद तेलवाडी सेक्‍शन आणि औट्रम घाटाचा बोगदा असे प्रकल्प आहेत. यातील नवा बायपास आणि औरंगाबाद तेलवाडी सेक्‍शनच्या निविदा निघाल्या आहेत. धुळे-सोलापूर महामार्गाचे काम सुरू असले तरी त्याला गती मिळण्याची गरज आहे. ही महत्त्वाची कामे सांभाळणाऱ्या एनएचएआयच्या प्रकल्प संचालक पदावर असलेले श्री. घोटकर यांची नांदेडला बदली झाल्यानंतर नागपूर येथील श्री. गाडेकर यांनी सोमवारी (ता. २३) प्रकल्प संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. सहाच महिन्यांपूर्वी घोटकर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. सुरू असलेल्या कामांची माहिती घेत त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांची भेटही घेतली. आगामी तीन दिवस ते दौऱ्यावर जाणार असून, यादरम्यान दोन दिवस ते मराठवाड्यातील कामांना साइट व्हिजिट करणार आहेत. याशिवाय राज्याच्या आढावा बैठकीकरिता मुंबईला ते रवाना होणार आहेत. 

जालना रोड डीपीआरची दिल्ली दरबारी लोळण
औरंगाबाद शहराची लाइफलाइन असलेल्या जालना रोडच्या विस्तारीकरणाचा डीपीआर तयार करण्याचे काम गेल्यावर्षी सुरू करण्यात आले होते. हा डीपीआर एप्रिल महन्यातच केंद्र सरकारकडे रवाना करण्यात आला होता. सुमारे ८०० कोटींचा हा प्रकल्प दिल्ली दरबारी गेल्या सहा महिन्यांपासून लोळण घेत आहे. हे काम मार्गी लागण्यासाठी २०१८ ची वाट पाहावी लागणार असली तरी त्यासाठीचा पाठपुरावा होणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com