चित्रपटातील गुंडागर्दीचा शाळेत थरार

मनोज साखरे
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - दाक्षिणात्य चित्रपटातील गुंडागर्दीचा थरार आता प्रत्यक्षातही पाहण्यास मिळत आहे. औरंगाबादेतील उस्मानपूरा भागात एका शाळेत चक्क सहा जणांच्या टोळक्‍याने हातात लाठ्या-काठ्या घेवून विद्यार्थ्यांना एकच मारहाण सूरू केली. याप्रकराने शाळेत खळबळ माजली. ही घटना 22 नोव्हेंबरला सकाळी अकराच्या सुमारास घडली असून हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांनी माहिती दिली की, उस्मानपुऱ्यात गुरु तेगबहाद्दुर इंग्रजी स्कुल असून तेथे विद्यार्थ्यांच्या आपसातील भांडणातून कोकणवाडीतील सहा तरुण लाठ्या-काठ्या, लोखंडी साखळी घेवून शाळेत घूसले. यानंतर त्यांनी काही विद्यार्थ्यांचा पाठलाग सुरु केला. त्यामुळे विद्यार्थी वर्गाकडे धावत सुटली. वर्गासमोरील एका कोपऱ्यात गाठून त्यांना टोळक्‍याने दंडूक्‍यासह साखळीने एकच मारहाण सुरु केली. हा प्रकार पाहताच विद्यार्थ्यांची एकच आरडाओरड सुरु झाली. त्यानंतर मुलं वर्गातून पटापट बाहेर आली. अचानक मारहाणीच्या प्रकाराने सर्वच भयभित झाले. यानंतर मध्यस्ती करुन शिक्षकांनी या टोळक्‍याची समजूत काढली. त्यानंतर ते शाळेतून निघून गेले. शाळेत धूडगूस घातल्याप्रकरणी शाळेत नोकरीस असलेले जितेंद्र गोविंदराव वाघमारे यांनी तक्रार दिली. त्यानुसार, शेख यासीर, अब्दुल गफार चाऊस, शेख इमरान शेख, सगीद, मोईस यूनूस मोहम्मद, फिरोजखान हमीद (रा. सर्व कोकणवाडी) यांच्याविरुद्ध धूडगूस घातल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली. 

सीसीटीव्हीत कैद  मारहाणीचा प्रकार 
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उस्मानपूरा पोलिसांनी फुटेज गोळा करून हस्तगत केले आहे. त्या आधारे संशयितांविरूद्ध गुन्ह्याची नोंद झाली असून कायदेशिर प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: aurangabad news marathwada school beating cctv camera