अधिकचे प्रवेश केल्यास महाविद्यालयांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील ‘स्पॉट ॲडमिशन’नंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर येत्या गुरुवारपर्यंत (ता. ३१) प्रवेश मिळणार आहेत. पदव्युत्तर प्रवेशासाठी मान्य जागांपेक्षा जास्त प्रवेश दिल्यास संबधित महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विशेष कार्यासन अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दिली.

पहिल्या यादीत प्रवेश फ्रीज केलेल्या आणि दुसऱ्या यादीत प्रवेश फ्रीज व ॲलॉटमेंट पत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांना १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्टदरम्यान सायंकाळी संबंधित विभागात; तसेच महाविद्यालयात प्रवेश देण्यात आले. ‘स्पॉट ॲडमिशन’मध्ये रसायनशास्त्र, गणित, समाजकार्य व विधी अभ्यासक्रम वगळता सर्व विषयांच्या याद्या महाविद्यालयनिहाय प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या महाविद्यालयांनी ३१ ऑगस्टपर्यंत गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात यावेत, असेही डॉ. सरवदे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: aurangabad news marathwada university

टॅग्स