वीज मीटरच्या रीडिंगचे खासगीकरणही अयशस्वी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

औरंगाबाद - महावितरणतर्फे वीज मीटरचे रीडिंग घेण्याच्या खासगीकरणाने अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यामुळे महावितरण बदनाम होत आहे. रीडरच्या चुकांमुळे ग्राहकांसह अधिकारी, कर्मचारीही त्रस्त झाल्याने आऊटसोर्सिंग बंद करण्याचा विचार सुरू आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी ही माहिती मंगळवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली. 

ग्राहकांच्या वीजमीटरची नोंद घेण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्यात आलेली आहे. एजन्सीचे कर्मचारी चालबाजी करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. अनेकांचे युनिट कमी दाखवणे, कुणाचे युनिट हेतुत: अधिक दाखवणे, वेळेवर रीडिंग न घेणे असे प्रकार होत आहेत. 

या प्रकाराने ग्राहकांना अचूक बिल मिळत नाही, अवाच्या सव्वा बिल आल्याने ग्राहकांच्या महावितरणच्या कार्यालयात चकरा सुरू होतात. त्यामुळे हे खासगीकरण रद्द करुन आयटीआय, तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांमार्फत रीडिंग घेता येईल काय याची चाचपणी करण्यात येत असल्याचे श्री. गणेशकर यांनी सांगितले. कमवा आणि शिका योजनेचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना पार्टटाइम काम करून त्यांच्या अर्थार्जनाची सोय होऊ शकणार आहे. यासाठी संबंधित प्राचार्यांशी बोलणी करून निर्णय घेण्यात येणार आहे.

मराठवाडा

औरंगाबाद  : यंदा वेळेवर व भरपूर पाऊस पडणार, असा हवामान विभागाने अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी वेळीच मशागत केली होती....

10.09 AM

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. सद्यस्थितीत ३० हजार क्युसेक वेगाने पाणलोट क्षेत्रातुन...

09.48 AM

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM