मल्टिप्लेक्‍सचे तिकीट २० ते ३० रुपयांनी स्वस्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

असा कमी झाला कर
पूर्वी एका तिकिटावर सरसगट ४० टक्‍के कर 
आता १०० रुपयांच्या तिकिटावर १८ टक्‍के कर. 
रु.१०१ च्या पुढील तिकिटावर २८ टक्‍के कर.

औरंगाबाद - जीएसटीमुळे कुठे खुशी तर कुठे गम आहे. दरम्यान, मल्टिप्लेक्‍समध्ये सिनेमा पाहणाऱ्यांसाठी हा कर पर्वणी ठरला आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी मल्टिप्लेक्‍समध्ये ४० टक्‍के कर आकारण्यात येत होता. आता तो कमी होऊन २८ आणि १८ टक्‍क्‍यांवर आला आहे. यामुळे तिकीट दर २० ते ३० रुपयांनी कमी होणार आहेत. 

शहरात मल्टिप्लेक्‍समध्ये सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून एका तिकिटावर चाळीस टक्‍के कर आकारण्यात येत होता. आता जीएसटीमुळे त्यात २२ व १२ टक्के रक्कम वाचणार आहे. यामुळे तिकीट दर कमी होऊन मल्टिप्लेक्‍समध्ये सिनेमा पाहणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होण्यास मदत होणार आहे. पूर्वी तिकीट दर जास्त असल्यामुळे काही प्रेक्षक एक पडदा असलेल्या सिनेमागृहात जायचे. या कर प्रणालीमुळे हेच प्रेक्षक आता मल्टिप्लेक्‍सकडे वळतील. शनिवारपासून (ता. एक) शहरातील सिनेमागृहांतील सर्वच सिस्टम अपडेट करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने तिकीट विक्री करण्यात येत आहे. 

टॅग्स