भरदिवसा एकाचा खून

भरदिवसा एकाचा खून

औरंगाबाद - रोहिलागल्ली भागात राहणाऱ्या  सय्यद अकील हुसैन हामेद हुसैन (वय ४५, रा. टाऊन हॉल-नूर कॉलनी) यांचा खून झाल्याची घटना रविवारी (ता. दहा) दुपारी चारच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील एका बंगल्याच्या सीसीटीव्हीत दोन महिला कैद झाल्या. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नातेवाईक तक्रार द्यायला तयार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सिटी चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ४५ वर्षीय व्यक्तीचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सिटी चौक पोलिस ठाण्याच्या पाठीमागील रोहिलागल्ली भागात घडली. मारेकरी आणि फरारी झालेल्या महिला या गल्लीतील एका बंगल्यातील सीसीटीव्हीत कैद झाल्या. आज दुपारी चारच्या सुमारास सय्यद अकील हे पळ काढणाऱ्या महिलेच्या घरी असताना दलालवाडीत राहणाऱ्या दोघांनी अकील यांच्यावर चाकूने वार केले. त्यांच्या गळ्यावर, मानेवर, हातावर आणि पोटावर वार करण्यात आले. गंभीर जखमी होताच या महिलेने तिचा नातेवाईक इस्माईल शेख अयुब यास बोलावून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच इस्माईलने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी असलेल्या अकील हुसैन यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. 

घटनेनंतर मृत अकील हुसैन यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील नागरिकांनी तेथे राहत असलेल्या महिलेच्या भावांनी हा खून केल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक जानकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

पाठोपाठ त्यांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. पोलिसांनी घरातून रक्ताचे नमुने ताब्यात घेतले. पोलिसांनी अकील हुसैन यांचा खून झाल्याची माहिती दिली. मात्र खून कोणी व कोणत्या कारणाने केला, याचा तपास सुरू असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com