पाकिस्तान मुर्दाबाद... जवान संदीप जाधव अमर रहे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

अंधारी (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद): पाकिस्तान मुर्दाबाद... जवान संदीप जाधव अमर रहे... असे फलक हाता घेऊन मुस्लिम बांधवांनी गावांत निषेध फेरी काढली.  

अंधारी (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद): पाकिस्तान मुर्दाबाद... जवान संदीप जाधव अमर रहे... असे फलक हाता घेऊन मुस्लिम बांधवांनी गावांत निषेध फेरी काढली.  

अंधारी येथे आज (सोमवार) साध्या पद्धतीने ईद साजरी करण्यात आली. पुँछ (काश्मीर) मध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना श्रदांजली अर्पण करून पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गावांत निषेध फेरी काढली होती.

यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद!, संदीप जाधव अमर रहे!, असे फलक घेऊन घोषणाही दिल्या. या फेरीत गावांतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, त्यात तरुणांची संख्या मोठी होती.