औरंगाबादचा ‘समृद्धी’ रस्ता, सबसे सस्ता!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

औरंगाबाद - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी जिल्ह्यात प्रतिकिलोमीटर ४८.८९ कोटी रुपये इतका खर्च लागणार आहे. ७१० पैकी १५५ किलोमीटरचा मार्ग औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांमधून जाणार आहे. दरम्यान, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतच या रस्त्याच्या निर्मितीसाठी सर्वांत कमी खर्च येणार आहे.

प्रस्तावित समृद्धी महामार्गाची सुमारे दहा हजार हेक्‍टर जमिनीवर निर्मिती करण्यात येणार आहे. बांधकामासाठी पाच विभागांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात निर्मिती खर्च वेगवेगळा आहे. प्रत्येक विभागातून जाणाऱ्या रस्त्याची लांबीही वेगवेगळी आहे. त्याच धर्तीवर प्रत्येक विभागाला रस्ता निर्मिती आणि जमिनींचे व्यवहार यासाठी वेगवेगळी रकम मंजूर करण्यात आली आहे. मराठवाड्यातील या दोन जिल्ह्यांत १५५.०२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची उभारणी करण्यासाठी ७५७९.५२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. या तरतुदीनुसार औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील रस्त्याच्या उभारणीसाठी प्रतिकिलोमीटर ४८.८९ कोटी रुपये एवढा खर्च लागणार आहे.