‘यिन’च्या पुरस्काराने मिळाली नवी दिशा

‘यिन’च्या पुरस्काराने मिळाली नवी दिशा

औरंगाबाद - अडथळ्यांवर मात करून समाज व देशासाठी रचनात्मक काम करणाऱ्यांच्या पाठीवर ‘यिन’तर्फे कौतुकाची थाप देण्यात आली. सामाजिक, कला, विज्ञान तंत्रज्ञान, क्रीडा, लीडरशिप आणि संशोधन-स्टार्टअप क्षेत्रांतील सहा युवकांना ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन), पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग, नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे मुख्य प्रायोजकतर्फे ‘यूथ इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड २०१८’ देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार नवी दिशा देणारा असल्याची प्रतिक्रिया पुरस्कारप्राप्त युवकांनी दिल्या.

यिनने केलेला हा गौरव माझा नसून, ऊर्मी आधार केंद्रातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. त्यांच्या पाठबळाने इथपर्यंत आलो आहे. ऊर्मी आधार केंद्राच्या माध्यमातून  शेतकरी आत्महत्याग्रस्त मुले माझ्याकडे आहेत. त्यांनी दहावीत ८० टक्‍क्‍यांपर्यंत गुण मिळवले आहेत. त्यांना हव्या त्या करिअरकडे घेऊन जाण्यासाठी मी सुरवात केली आहे. यिनमुळे एक दिशा मिळाली आहे.
- जय पाटील (सामाजिक क्षेत्र) 

हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण मी शेतकरी वर्गातील आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या गोष्टी खूपच कमी आहेत. त्यातच मी दुष्काळी जालना जिल्ह्यातील आहे. येथील पीक उगवल्यानंतर ते कसं जगतं सांगताच येत नाही. सायंकाळी माना टाकलेली पिके सकाळी टवटवीत झालेले असतात. हा पुरस्कार माझ्यासाठी तीच ‘सकाळ’ आहे. 
- राजकुमार तांगडे, कला साहित्य क्षेत्र

सूर्यकुंभ प्रकल्पाच्या माध्यमातून सूर्यप्रकाश आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना शिकवला. यातून विश्‍वविक्रम झाला. हे शक्‍य झाले ते सहयोगातून. सहयोगातून अनेक जागतिक विक्रम होऊ शकतात. हा पुरस्कार त्या विद्यार्थ्यांना जातो ज्यांनी आमच्यावर विश्‍वास ठेवला. आम्ही जे काम केले तेच काम ‘यिन’च्या माध्यमातून आज होताना दिसत आहे.
- विवेक काबरा , विज्ञान तंत्रज्ञान

 या पुरस्कारामुळे माझ्या परिवारालाही खूप आनंद झाला आहे. भारतीय म्हणून मला या पुरस्काराचे नेहमीच कौतुक राहील; तसेच माझ्या करिअरलाही हा पुरस्कार नेहमीच प्रेरणा देत राहील. 
- मृणाल हिवराळे, क्रीडा क्षेत्र

लहान असताना नवीन करण्याची इच्छा होती. तेव्हापासून नवनवीन प्रयोग करीत आहे. या नवीन केलेल्याची दखल ‘यिन’ने घेतली आहे. या पुरस्काराचे श्रेय माझ्या आईला आहे. ती माझ्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देत आली आहे. यामुळेच नवे काही करण्याची ऊर्मी मिळू शकली आहे. मी प्रॉडक्‍शन हाऊस सुरू केले. औरंगाबादेत राहून काहीतरी नवीन करत ते बदलण्याची माझी इच्छा आहे. 
- हर्षवर्धन शाही, यूथ लीडर

ब्लॉगच्या माध्यमातून फोन सुरक्षा, इंटरनेट सुरक्षा यावर लिहायला लागलो. यामूळे ब्लॉग खूप प्रसिद्ध झाला. यातून विदेशातून मोठे क्‍लायंट मिळाले. यातून पुढे थिम कॅफेवर उडीज कॅफे सुरू केले आहे. नवे करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. यिनने या नवीन कल्पनांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत. 
- अरविंद पगारे, संशोधन तंत्रज्ञान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com