औरंगाबाद-जळगाव रस्ता चौपदरी करणार - गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

सिल्लोड - ‘‘औरंगाबाद-जळगाव रस्ता चौपदरी करण्यात येईल,’’ अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. औरंगाबाद ते जळगाव रस्त्याच्या सिमेंटीकरण कामाचा प्रारंभ श्री. गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (ता. २९) करण्यात आला. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, संतोष दानवे, शशिकांत खेडेकर आदी उपस्थित होते.

सिल्लोड - ‘‘औरंगाबाद-जळगाव रस्ता चौपदरी करण्यात येईल,’’ अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. औरंगाबाद ते जळगाव रस्त्याच्या सिमेंटीकरण कामाचा प्रारंभ श्री. गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (ता. २९) करण्यात आला. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, संतोष दानवे, शशिकांत खेडेकर आदी उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, ही सर्वांची अपेक्षा आहे. पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये तीन लाख कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. ठरविलेली कामे मी पूर्ण करतोच. मराठवाड्यातील रस्त्यांच्या कामासाठी ७५ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत या सर्व कामांना सुरवात करण्यात येणार आहे. विकासकामे करताना कुठलाही भेदभाव करायचा नाही, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीने मला शिकविले आहे.’’

खासदार दानवे म्हणाले, ‘‘औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या कामाची अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी आहे. वर्षभरामध्ये या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. खरे तर यापूर्वी या रस्त्याच्या कामाचे उद्‌घाटन झाले होते; मात्र काम काही झाले नाही. आता मात्र या कामास ताबडतोब सुरवात करण्यात येणार आहे.’’ या प्रसंगी हरिभाऊ बागडे, चंद्रकांत खैरे, पंकजा मुंडे, अब्दुल सत्तार यांनी मनोगत व्यक्त केले.

जमीन अधिग्रहणासाठी घ्यावा आमदार, खासदारांनी पुढाकार 
लोकप्रतिनिधींनी औरंगाबाद-जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी केल्यानंतर श्री. गडकरी यांनी रस्ता चौपदीकरण करण्यात येऊन सिमेंटचे चार लेन टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. सोबतच रस्त्यालगतच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी बघता खासदार, आमदारांनी मिळून जमीन अधिग्रहण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
लक्ष्मीदर्शन घेत नाही

श्री. गडकरी म्हणाले, ‘‘पुढील दोनशे वर्षांपर्यंत या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही या पद्धतीने काम करून घेण्यात येणार आहे. मी कधी लक्ष्मीदर्शन घेत नसल्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत कुठलीही तडजोड चालणार नाही. या रस्त्यावर अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या ९० ठिकाणी अंडरपास रस्ता करण्यात येणार असून, अपघात होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. या रस्त्यावरील प्रत्येक पुलांच्या ठिकाणी पाणी अडविण्यासाठी पूल कम बंधारा बांधण्यात येणार आहे.

मराठवाडा

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017