संपादीत जमीनीचा मावेजा न दिल्याने उपविभागीय अधिकाऱ्याची खुर्ची जप्त

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 7 जुलै 2017

औरंगाबाद: पाझर तलावासाठी संपादीत जमीनीचा मावेजा देण्यात यावा, असे न्यायालयाने आदेश दिले. मात्र, सहा महिन्याचा काळ उलटूनही त्याकडे दूर्लक्ष केल्याने शुक्रवारी (ता. सात) न्यायालयाच्या आदेशावरुनच संबधित उपविभागीय अधिकाऱ्याच्या खुर्चीसह संगणक जप्त करण्यात आले.

औरंगाबाद: पाझर तलावासाठी संपादीत जमीनीचा मावेजा देण्यात यावा, असे न्यायालयाने आदेश दिले. मात्र, सहा महिन्याचा काळ उलटूनही त्याकडे दूर्लक्ष केल्याने शुक्रवारी (ता. सात) न्यायालयाच्या आदेशावरुनच संबधित उपविभागीय अधिकाऱ्याच्या खुर्चीसह संगणक जप्त करण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथील चंद्रकांत नागोराव नागरे यांनी दोन वर्षापूर्वी पाझर तलावासाठी दोन एकर जमीन दिली. तेंव्हापासून ते आपल्याला संबधित जमिनीचा 7 लाख 42 हजार 864 रुपये मावेजा मिळावा, यासाठी उपविभागीय कार्यालयात खेटे मारत होते. मात्र, वारंवार विनंती करूनही काहीच फरक पडत नसल्याने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. व्याजासह आता ही रक्‍कम 9 लाखांपर्यंत पोहचली आहे.

दरम्यान, मावेजा द्यावा, अन्यथा खुर्ची जप्त करा, असे आदेश दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. बी. तोष्णीवाल यांनी डिसेंबर 2016 मध्येच दिले. यास सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटला तरी अधिकाऱ्यांना काहीच फरक पडला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची प्रत सोबत घेत जप्ती अधिकारी अशोक पाथ्रे, पी. पी. वाघमारे यांनी शुक्रवारी चिकलठाणा येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या खुर्चीसोबत संगणकाचे चार संच जप्त केले. यावेळी शेतकरी चंद्रकांत नागरे हे देखील उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

आता शाळा सुटेल, पण पाटी फुटणार नाही; 'खापराची' पाटी होतेय गायब

द. चिनी समुद्रात अमेरिकेची लढाऊ विमाने;चीनला थेट आव्हान

विक्रीतील मध्यस्थ हटवून वाढवला शेतीतील नफा

वयाच्या पंचाहत्तरीतही मुख्याध्यापक झाले विद्यार्थी

मेरे बस में होता, तो बुऱ्हान वणीको जिंदा रखता: काँग्रेस नेता