ऑनलाईन वीजबिल भरणा 58 कोटींनी वाढला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

औरंगाबाद - महावितरणतर्फे वीज ग्राहकांना घरबसल्या बिल भरण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत 11 जिल्ह्यांतील तीन लाख 44 हजार 169 वीजग्राहकांनी महावितरणचे संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपच्या माध्यमातून डिसेंबर 2017 मध्ये 124.07 कोटी रुपये ऑनलाईन वीज भरणा केल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. 

ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीजजोडण्याचेही बिल भरण्याची सेवा उपलब्ध असून यामुळे रांगेत उभे राहणे, बिल न मिळणे या गोष्टींना आता थारा नसणार आहे. या सुविधेमुळे नोव्हेंबर 2017 पेक्षा डिसेंबर महिन्यात 58.33 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. 

महावितरणच्या लघुदाब वीज ग्राहकांसाठीही ही सुविधा असून, मोबाईल ऍपद्वारे चालू व मागील वीज बिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅंकिंग, क्रेडिट / डेबिट कार्डसह मोबाइल वॉलेट आणि कॅश कार्डचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यावर वीजबिल भरल्याच्या पावतीचा तपशीलही दिसून येत आहे. 

ऑनलाईनचा टक्का  वाढविण्यासाठी जागृती 
ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यासाठी महावितरणतर्फे जनजागृतिपर विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. अधिकाधिक ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरण्याचे आवाहन प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे. 

ग्राहकांनी भरणा केलेल्या वीजबिलाचा तपशील (नोव्हेंबर - डिसेंबर 2017) 
परिमंडल नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर 
ग्राहक संख्या रक्कम कोटी रु. ग्राहक संख्या रक्कम कोटी रु. 
औरंगाबाद 1 लाख 410 21.09 1 लाख 271 33. 03 
जळगाव 97 हजार 480 19.14 98,429 33.51 
लातूर 80 हजार 670 13.33 92,315 33.45 
नांदेड 47 हजार 120 11.37 53 हजार 154 24.08 
------------------------------------------------ 
एकूण 3 लाख 25 हजार 680 65.74 3 लाख 44,169 124.07 

Web Title: aurangabad news Online Electricity Bills MSEB