रक्षाबंधन सणालाही ऑनलाईन तडका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - पूर्वी शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर असणाऱ्या भावाला बहीण राखी टपाल किंवा कुरिअरच्या माध्यमातून पाठवत असे; परंतु या माध्यमाद्वारे पाठविलेली राखी त्याला मिळेलच याची शाश्वती नाही. अनेकजण ऑनलाईन माध्यमाद्वारे हा सण साजरा करताना दिसताहेत.

कित्येकदा राखी वेळेआधी पाठवूनही ती भावापर्यंत पोचत नाही. आणि राखी भावापर्यंत पोचली तर ती बांधणार कोण? असा प्रश्‍न बहिणींपुढे असतो. अशा माध्यमांना आता फाटा देत त्यावर आता बहीण-भावांनी रक्षाबंधनासाठी ऑनलाईनचा पर्याय निवडला आहे. यात व्हॉट्‌सॲप, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून शुभेच्छांचे संदेश पाठविले जातात. त्यामुळे दूर राहूनही एकमेकांजवळ असल्याची भावना दिसून येत आहे. 

गिफ्ट देण्याचे ई-पर्याय
सध्या भीम, विविध बॅंकांचे युपीआय असे ऑनलाईन पैसे पाठविण्याचे ॲप्स उपलब्ध आहेत. बहीण भावाला ॲप्सच्या माध्यमातून राखीसाठी पैसे पाठवते, तर भाऊ रक्षाबंधनाची ओवाळणीही ई माध्यमातून पाठवतो.
फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, ईबे, ईबडी अशा ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून गिफ्ट बहिणीच्या पत्त्यावर पाठवायचे. 

माझा भाऊ नोकरीनिमित्त वापी येथे राहतो. आता रक्षाबंधनला त्याला सुटी मिळाली नाही. त्यामुळे मी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून ओवाळणी केली आणि राखी घेण्यासाठी त्याला ॲप्सच्या माध्यमातून पैसे पाठविणार आहे. त्याने ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून मला गिफ्ट पाठविले. दूर असूनही त्याने ओवाळणी पाठविली, त्यामुळे मला मोठा आनंद झाला.
- सुरेखा सपकाळ, गृहिणी