पासपोर्ट कार्यालय तत्पर; पडताळणीला लागतात महिने 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - शहरात सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयामुळे नागरिकांचे मुंबई हेलपाटे वाचले असले, तरी पोलिस ठाण्यांच्या हेलपाट्यांमधून अद्याप सुटका झालेली नाही. कार्यवाहीसाठी मुंबईचे कार्यालय तत्पर असले, तरी पोलिस ठाण्यांमधील पडताळणी तीन ते पाच महिने रखडत असल्याने अर्जदार हैराण झाले आहेत. पासपोर्टसाठीच्या पडताळणीला ऑनलाइन करण्याचा शब्द वल्गना ठरल्याने ही समस्या उद्भवत आहे. 

शहरात पासपोर्टचे अर्ज सादर करण्यासाठी कार्यालयाची उभारणी करण्यात आली. मुंबईहून येणाऱ्या फायली पोलिस आयुक्तालय आणि संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये पडून राहत असल्याने अर्जदारांना पासपोर्ट मिळविण्यासाठी अनेक महिने वाट पाहावी लागत आहे. मुंबईहून येणारी फाईल पोलिस आयुक्तालयात येते आणि तेथून विविध ठाण्यांमार्फत तिची पडताळणी होऊन ती माघारी मुंबईला  जाण्यासाठी २१ दिवसांचा अवधी अपेक्षित आहे. असे असताना तीन ते पाच महिने पडताळणीसाठी लागत आहेत. २१ दिवसांचा अवधी उलटला की त्या फाईलसाठी विभागीय पासपोर्ट कार्यालयातून त्यासाठी स्मरणपत्रही औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाला देण्यात येते. असे असले तरी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. ऑगस्ट महिन्यांत सादर पासपोर्टचे अर्ज औरंगाबादेत येऊन पडले आहेत आणि नोव्हेंबर लागला तरी त्यांच्या पडताळणीची कारवाई पूर्ण झालेली नाही.

ग्रामीण कार्यालयाचा कारभार ‘ऑनलाइन’
औरंगाबाद ग्रामीण कार्यालयाने हातोहात टपाल देण्याच्या प्रक्रियेला फाटा देत ‘ऑनलाइन’ कारभाराची कास धरली आहे. मोबाईल पासपोर्ट पोलिस ॲपचा शहर पोलिसांना तिटकारा कशासाठी? असा सवाल केला जातो आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी पोलिस आयुक्तालय पावले टाकत नसल्याने हा त्रास किती दिवस सहन करायचा या विवंचनेत सध्या पासपोर्ट अर्जदार आहेत.

औरंगाबादेतून पडताळणीच्या फायली परत येण्यासाठी वेळ लागत आहे. उशीर झाल्यास पोलिसांना २१ दिवसांनी रीतसर स्मरणपत्र दिले जाते. प्रशासनाच्या अन्य घटकांशी चर्चा करून प्रश्‍न मार्गी लावू. 
- स्वाती कुलकर्णी, विभागीय पासपोर्ट अधिकारी

आयुक्तालयाकडे असलेल्या येथील पासपोर्ट विभागाच्या कामाचा आढावा वेळोवेळी घेतला जातो. विलंबाचे नेमके कारण शोधण्यासाठी ठाणे स्तरावर आढावा घेऊ. 
- दीपाली घाडगे, पोलिस उपायुक्त

Web Title: aurangabad news passport office