आता मोबाइलवरून काढा पीएफ!

आता मोबाइलवरून काढा पीएफ!

औरंगाबाद - भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे देशभरातील पीएफधारकांसाठी ‘उमंग’ ॲप तयार करण्यात आले आहे. यामुळे पीएफ खात्याची सर्व माहिती ऑनलाइन मिळणार आहे. एवढेच नाही तर या माध्यमातून ट्रान्सफर आणि विड्रॉलही करता येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या ४५ विभागांच्या १४९ सुविधांची माहिती या ॲपवर आहे. 

पीएफ काढण्यासह देशभरात दरवर्षी जवळपास एक कोटी अर्ज येतात. हे काम आता ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन होणार आहे. त्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधीच्या देशभरातील १२३ कार्यालयांपैकी ११० कार्यालये आता केंद्रीय सर्व्हरला जोडण्यात आली आहेत. ऑनलाइन कार्यप्रणाली हे ईपीएफओची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामुळे तीन तासांत पीएफच्या केलेल्या दाव्याचा निपटारा करण्याची तयारी करण्यात येणार आहे. सध्या पीएफचे दावे सोडविण्यासाठी वीस दिवस लागतात, अशी माहिती पीएफ कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. 

‘उमंग’वर आहेत या सुविधा...
पंतप्रधान कौशल्य विकास योजना, परदेश वस्ती, ईपीएफओ, फार्मा सही दाम, किसान सुविधा, भारत गॅस, ई-पाठशाला, एनपीएस, एआयसीटीई, पीक विमा, पासपोर्ट सेवा, भारत बिल पे, सीपीजीआरएएमएस, अन्नपूर्णा कृषी प्रसार सेवा, माय पॅन, आधार कार्ड, विविध राज्यांचे रेव्हेन्यू विभाग, आयकर भरणा, ओआरएस, डिजीसेवक, केंद्रीय विद्यालय संस्था, परिवहन सेवा वाहन, पीएमएवाय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, माती आरोग्य कार्ड, राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल, लाइफ सर्टिफिकेट, जीएसटी नेटवर्क, विपणन आणि तपासणी संचालनालय, विस्तार सुधारणा, शेती तंत्रज्ञान, सीआरपीएफ, सीबीएसई, सुखद यात्रा, सेवा निवृत्तीधारक पोर्टल, इंडेण गॅस या सुविधा या ॲपवर आहेत. यांसह विविध राज्यातील महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन याचीही माहिती देण्यात आली आहे. 

नागरिकांच्या सुविधेसाठी हे ॲप तयार करण्यात आले आहे. त्या माध्यमातून ऑनलाइन पासबुक पाहता येते. दावाही दाखल करून दाव्यांची पडताळणी करता येते. टीआरआरएची स्थिती तपासता येते. तसेच पीएफ कार्यालय शोधता येते. 
- एम. एच. वारसी,  पीएफ आयुक्‍त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com