"प्रदूषण नियंत्रण'च्या 118 क्षेत्र अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या रद्द 

"प्रदूषण नियंत्रण'च्या 118 क्षेत्र अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या रद्द 

औरंगाबाद - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 118 क्षेत्र अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला. या पदासाठी चार महिन्यांच्या आत नव्याने निवड प्रक्रिया राबवावी, तसेच याचिकाकर्त्यांना खर्चापोटी प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे आदेश न्यायमूर्ती आर. डी. धानुका व न्यायमूर्ती सुनील के. कोतवाल यांच्या पीठाने निकालात स्पष्ट केले. या याचिकेमुळे मंडळाच्या पदभरतीतील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. 

मंडळाने 2009 ची विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता भंग, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व शासकीय नियमांचा भंग केल्याचा आक्षेप सदर जनहित याचिकेत करण्यात आला होता. प्रदीप गणपतराव कराड व इतरांनी विविध याचिका दाखल करून मंडळाच्या पद नियुक्तीला आव्हान दिले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 21 जानेवारी 2009 ला 34 क्षेत्र अधिकारीपदासाठी एका वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली; पण त्यात मंडळाचे नाव, पत्ता व इतर बाबी जाहीर केल्याच नाहीत. उलट सायन येथील एका पत्रपेटीचा क्रमांक देत त्याच पत्त्यावर अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. जाहिरातीनुसार अनुसूचित जातीसाठी एक पद, अनुसूचित जमातीसाठी पाच, भ.ज.प. एक, तर खुल्या प्रवर्गासाठी 27 पदे आरक्षित ठेवण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निवड प्रक्रिया असतानाही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. ऑक्‍टोबर व नोव्हेंबर 2009 मध्ये 118 क्षेत्र अधिकाऱ्यांची निवड यादीही प्रसिद्ध करण्यात आली; परंतु महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. 

दोन तासांत सव्वाशे मुलाखती 
22 ऑक्‍टोबर 2009 ला सकाळी दोन तासांत 126 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्याचा आक्षेप याचिकेत नोंदविण्यात आला होता. 851 उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्व उमेदवारांना निवड समितीतील पाच सदस्यांनी सारखेच गुण दिले. गैरहजर उमेदवारांना हजर दाखविण्यात आले. गुणांमध्येही खाडाखोड करण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com