बाबांचा समाजसेवेचा वारसा आम्ही जपतोय - प्रकाश आमटे

बाबांचा समाजसेवेचा वारसा आम्ही जपतोय - प्रकाश आमटे

निलंगा - एखाद्या व्यक्तीवर करण्यात येणाऱ्या उपचांरापेक्षा त्यास देण्यात येणारे मानसिक समाधान महत्त्वाचे असते. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोगाबाबत जागृती करून पीडितांची सेवा केली. तोच वारसा आम्ही जपतोय, असे मत समाजसेवक प्रकाश आमटे यांनी सोमवारी ता. २० येथे व्यक्त केले.

जिवलग फाउंडेशनच्यावतीने आयोजित ‘समाजाचे आधारस्तंभ’ या पुरस्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर होते, तर व्यासपीठावर डॉ. एस. एन. सुब्बाराव, श्रीमती मंदाकिनी आमटे, कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर राव, प्राचार्य सोमनाथ रोडे उपस्थित होते. 

श्री. आमटे म्हणाले, की आजच्या तरुणांनी व्यसनमुक्त होणे गरजेचे असून, कोणतेही  विधायक काम निष्ठेने केल्यास त्यामध्ये यश मिळते. असेच काम बाबा आमटे यांनी केले आहे. समाजात अतिशय तुच्छतेने पाहिले जाणाऱ्या कुष्ठरोग्यांमध्ये जगण्याची उमेद त्यांनी निर्माण केली. सध्याचे शासन व प्रशासन जाणीवशून्य असून ते सामाजिक समस्यांकडे गांभीर्याने पाहत नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, की आजच्या युवकांनी सद्‌सद्विवेक जागा ठेवून मतदान करणे गरजेचे आहे. लोकशाही बळकट करणासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे. कुलगुरू पंडित विद्यासागर राव यांनी सध्याच्या शेतकऱ्यांच्या अत्महत्या म्हणजे सामाजिक कलंक असल्याचे सांगून आयुष्यात पुढे जा; परंतु समाजासाठी काहीतरी करा असे अवाहन केले. प्राचार्य सोमनाथ रोडे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

जिवलग फाउंडेशनच्यावतीने माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कृतज्ञता, डॉ. एस. एन. सुब्बाराव यांना मानवता, प्रकाश आमटे  यांना समाजरत्न, संभाजीराव पाटील निलंगेकर यांना युवारत्न, डॉ. विठ्ठलराव लहाने, कुलगुरू पंडित विद्यासागर राव, उपविभागीय आधिकारी भवानजी आगे-पाटील, रवी बापटले, सोमनाथ रोडे आदींना आधारस्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सतीश हानेगावे यांनी, तर आभार प्रा. गजेंद्र तरंगे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com