'अब्दुल सत्तार यांची आमदारकी त्वरीत रद्द करा'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

  • विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील दहीगाव शिवार येथे शेतजमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला होता. जमिनीच्या वादात आमदार अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य भाषेत धार्मिक भावना दुखावतील अशी शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्यांची आमदारकी त्वरीत रद्द करावी या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे रविवार (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 

माहराण, शिवीगाळ प्रकरणात आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहे. शिवीगाळ केल्याने धार्मिक भावना दुखावल्या आहे.

त्यामुळे आमदारकी रद्द करुन अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी विहीपचे प्रांत अध्यक्ष संजय बारगजे, प्रांतसहमंत्री रामदास लहाबर, राजीव जहागिरदार, ऍड. सुनिल चावरे, ऍड. कानिशाथ डापके, राजेश जैन, शैलश पत्की, बजरंग दलाचे शहर संयोजक मोहीत देशपांडे, सुभाष मोकारिया, विवेक कानडे, श्रीपाद मुळे, महेश ढोरकट, सचिन राठोड, राहुल दांडगे, अमोल वर्मा, शेखर ढोले, कपिल गायकवाड, अमीत जाधव यांनी केली आहे.