अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा फुलंब्रीत विहिंप, बजरंग दलाकडून निषेध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात मंगळवारी दुपारी निषेध नोंदविण्यात आला.

फुलंब्री : अमरनाथ येथील यात्रेकरूंवर 10 जुलै रोजी झालेल्या हल्ल्याचा बजरंग दल व विश्व हिंदू परिषद संघटनेच्या वतीने फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात मंगळवारी (ता. 12) रोजी दुपारी निषेध नोंदविण्यात आला.

यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री रंगनाथ गाडेकर, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक राज महाजन पाटील, कार्याध्यक्ष परमेश्वर काकडे, जिल्हा सह मंत्री ज्ञानेश्वर कोंडके, मंगेश सोनी, गोरक्ष मंडळ, शैलेश आरक, गणेश कोलते, लक्ष्मण कोलते, बाळू राऊत, अक्षय राजपूत, देवलाल राजपूत, योगेश राजपूत, आकाश गोरावणे, गणेश बहादुरे, प्रवीण त्रिंम्बक इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :