पुष्कर लोणीकर साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

औरंगाबाद - ‘सकाळ समूह’ आयोजित विद्यार्थ्यांसाठी ज्युनिअर लीडर खुली स्पर्धेच्या प्रमोशन कार्यक्रमात ‘एलिझाबेथ एकादशी’फेम बालअभिनेता पुष्कर लोणीकर बुधवारी (ता. १२) शहरातील सहा शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.

शाळा म्हणजे अभ्यास तर आहेच; पण खेळ, धमाल मस्ती आणि माहितीचा खजिनाही आहे. जीवनाला पैलू पाडणारी, नेतृत्व घडविणारी आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारीपण शाळाच. त्यात भर पडलीय ‘सकाळ’च्या ‘ज्युनियर लीडर’ची... मुलांमधील कौशल्यांच्या वाढीसाठी सुरू केलेल्या या सदराला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या या ‘ज्युनियर लीडर’चे शाळांच्या मुख्याध्यापकांनीही मनापासून स्वागत केले आहे. विद्यार्थी मित्रांना आकर्षित करणाऱ्या या सदरातून योगासनांची ओळख, स्लॅमबुकमधून भेटणारी रोल मॉडेल्स, व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध पैलू उलगडणारे लेखन, चेहऱ्यावर हास्य उमटवणारा हास्यकट्टा, गणितकोडी, सुविचार, दिनविशेष हे सर्व पैलू विद्यार्थ्यांना आवडतात. त्याचबरोबर सेल्फीमधून त्यांची छबीही झळकते.स्पर्धेत उतरताना असे बहुआयामी विषय त्यांनी अभ्यासावेत, यासाठी ‘सकाळ’तर्फे आता मराठवाडाभरात ज्युनिअर लीडर उपक्रम राबवला जात आहे. यात बुधवारी शहरातील सहा शाळांतील विद्यार्थ्यांशी मास्टर पुष्कर लोणीकर संवाद साधणार आहे.