रेल्वे दुरुस्ती पिटलाईन औरंगाबादेत करणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : परभणी ते मनमाड रेल्वेच्या दुहेरी लाईनच्या दुहेरीकरनाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे औरंगाबादला रेल्वे दुरुस्ती यंत्रणाचे (पिटलाईन)काम दीड वर्षात पूर्ण करणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी पिटलाईन साठी चिकलठान येथील रेल्वे च्या जागेची पाहणी केली. शहरातील संग्रामनागर रेल्वे गेटच्या अंडरपास चे काम सुरु करण्यासाठी निविदा मगवल्या आहेत. 15 डिसेबर पर्यंत काम पूर्ण करण्यासाठीची तयारी केली. मात्र, कामासाठीची रक्कम महापालिकेने तत्काळ भरावी, असे आवाहन त्यांनी केले. दिवाळीसाठी जो धपूर बीकानेर विशेष गाडी सुरु करण्यात येत असलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.