रेल्वे ओव्हरब्रीजच्या स्लॅबची तयारी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - जालना-औरंगाबाद महामार्गाला औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीशी जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रीजचे काम आता वेग घेत आहे. या ओव्हरब्रीजच्या स्लॅबची तयारी सध्या ऑरिक सिटीमध्ये सुरू आहे. 

औरंगाबाद - जालना-औरंगाबाद महामार्गाला औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीशी जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रीजचे काम आता वेग घेत आहे. या ओव्हरब्रीजच्या स्लॅबची तयारी सध्या ऑरिक सिटीमध्ये सुरू आहे. 

औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीला (ऑरिक) औरंगाबाद- जालना रस्त्याशी जोडण्यासाठी आणि रेल्वे लाईनवरून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या ओव्हरब्रीजची निर्मिती ऑरिकमध्ये करण्यात येते आहे. ऑरिकला मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या रेल्वे ओव्हर ब्रीजच्या कॉलम उभारणीचे काम एकीकडे सुरू असताना तयार झालेल्या कॉलमवर कॅरेज वेसाठीचा स्लॅब टाकण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. सुमारे ९०० मीटर लांबीच्या या रेल्वे ओव्हर ब्रीजसाठीचे १० पिलर आतापर्यंत पूर्णपणे उभारण्यात आले आहेत. जालना रस्त्याकडून ऑरिकमध्ये येणाऱ्या कॅरेज वेच्या स्लॅबची तयारी सध्या केली जात आहे. 

या ओव्हरब्रीजचे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून तो नव्या वर्षात खुला होणार आहे. या पुलाखालील असलेल्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या लहान ब्रीजचे कामही प्रगतिपथावर आहे. याचाच भाग असलेल्या रेल्वेच्या रुळांवरच्या पुलाचे काम रेल्वे विभागातर्फे करण्यात येणार आहे.