लातूर-बंगळुरू रेल्वेगाडीचे आरक्षण सुरू

लातूर-बंगळुरू रेल्वेगाडीचे आरक्षण सुरू

लातूर - लातूर-बंगळुरू रेल्वेगाडीला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली असून, येत्या चार फेब्रुवारीपासून ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. लातूर-बंगळुरू (यशवंतपूर) यादरम्यान ही गाडी धावेल. दरम्यान, या गाडीसाठी आरक्षण सुविधा सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुकीत लातूरहून नवीन रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. श्री. प्रभू यांनी लातूर-बंगळुरू रेल्वेसाठी तत्त्वतः मान्यताही दिली होती; मात्र मध्यंतरी रेल्वे मंत्रालयाची सूत्रे श्री. गोयल यांच्याकडे हस्तांतरित झाली. त्यानंतर केलेल्या पाठपुराव्यामुळे लातूर-बंगळुरू (रेल्वे क्रमांक १६५८४) ही गाडी सुरू झाली आहे. दरम्यान, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे या रेल्वेसाठी पाठपुरावा केला होता. यासाठी प्रयत्न केल्याबद्दल पालकमंत्र्यांचे भाजप शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.

येत्या चार फेब्रुवारीपासून आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धावणार असून या रेल्वेगाडीचे आरक्षणही सुरू झाले आहे. येथून आठवड्यातून गुरुवारी, शनिवारी व रविवारी या दिवशी ही रेल्वे धावणार आहे. येथील रेल्वेस्थानकातून दुपारी तीन वाजता निघालेली रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता बंगळुरूला पोचणार आहे. रेल्वे क्रमांक १६५८३ ही रेल्वेगाडी बुधवारी, शुक्रवारी आणि शनिवारी सायंकाळी सात वाजता बंगळुरू स्थानकावरून लातूरकडे रवाना होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com