टँकरग्रस्त गावांमध्ये बंधाऱ्यांच्या कामांना प्राधान्य द्या: रामदास कदम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयाणी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दड, अप्पर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांची उपस्थिती होती. 

औरंगाबाद : पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे यासाठी त्या थेंबाचे नियोजन होणे आवश्यक आहे. बंधाऱ्यांची कामे हाती घेताना टँकरग्रस्त गावांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयाणी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दड, अप्पर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांची उपस्थिती होती. 

पालकमंत्री रामदास कदम म्हणाले, विविध बंधाऱ्यांची कामे हाती घेताना टँकरग्रस्त गावांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. या गावांमध्ये बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्यास भविष्यात या गावांना टँकरची गरज भासणार नाही, याबाबतचे नियोजन करणे गरजेचे आहे. गावांमध्ये पाणीवाटप संस्थेने जबाबदारी घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच प्रत्येक गावात कोल्हापूर बंधाऱ्यांचे दरवाजांची दुरुस्तीवर लक्ष द्यावे. जिल्हा परिषद आणि जलसंधारण विभागाने एकत्रितपणे जिल्हयात आवश्यक असणाऱ्या बंधाऱ्यांच्या दरवाजासाठी सर्वेक्षण करुन आवश्यक असणाऱ्या ठिकाणी तत्काळ दरवाजे बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. 
 मराठवाड्यातील बंधाऱ्यांबाबतची सद्यस्थिती करावयाच्या उपाययोजना आणि नियोजन याविषयी  विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सविस्तर माहिती पालकमंत्री रामदास कदम यांना दिली.