‘सकाळ’चे रणजित खंदारे यांना बाळशास्त्री स्मृती पुरस्कार प्रदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

औरंगाबाद - कोल्हापूर येथील सोशल ॲण्ड एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे दिला जाणारा यंदाचा मानाचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार ‘सकाळ’चे वृत्तसंपादक रणजित खंदारे यांना निवृत्त न्यायमूर्ती तथा फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक बी. एन. देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

आविष्कार फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून गोरगरिबांच्या कल्याणासाठी आणि उपेक्षितांच्या सन्मानाचे काम करीत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी श्री. खंदारे यांचा या पुरस्काराने बुधवारी (ता. पाच) सन्मान करण्यात आला. या वेळी ‘सकाळ’चे  कार्यकारी संपादक संजय वरकड, सहयोगी संपादक दयानंद माने, व्यवस्थापक (माहिती-तंत्रज्ञान) योगेश पाटील, शिक्षण सहायक संचालक भास्करराव बाबर, उद्योगपती सदाशिवराव पाटील, आविष्कार फाउंडेशनचे मराठवाडा संपर्कप्रमुख डॉ. संतोष भोसले, उद्धव गरड उपस्थित होते.