धार्मिक स्थळांची पाडापाडी थांबवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करून महापालिका सामाजिक तेढ निर्माण करीत आहे. त्यामुळे ही कारवाई थांबविण्याची सूचना राज्य सरकारला करावी, अशी मागणी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे.  

खासदार श्री. खैरे यांनी मंगळवारी (ता. एक) राजनाथसिंह यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकारात्मक भूमिका घेण्याची सूचना राजनाथसिंह यांनी केली. 

आठ ऑगस्टला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी असून, त्याबाबत न्यायालयाला शासनामार्फत विनंती करण्याची मागणी श्री. खैरे यांनी केली. या वेळी खासदार संजय (बंडू) जाधव यांची उपस्थिती होती.