शालेय पोषण आहाराचा तांदूळ पकडला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

गंगापूर - शालेय पोषण आहाराचा शासकीय तांदूळ कमी किमतीत खरेदी करून काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्यासाठी नेत असताना बोलेगाव (ता. गंगापूर) फाट्यावर टेंपो पकडण्यात आला. या टेंपोसह त्यातील ८६ हजार नऊशे रुपये किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच संशयित आरोपींविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

संशयित आरोपींमध्ये चालक रवी भास्कर कोळसे (वय २७, रा. मांजरी ता. गंगापूर), शेख अयाज शेख आशपाक (वय २२), सुमेद जमील पठाण, शेरू कुदरत पठाण,  आशपाक हुसेन शेख (सर्व रा. गंगापूर) यांचा समावेश आहे. शालेय पोषण आहाराचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक येथील पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी गोण्यांची तपासणी करून पंचनामा केला आहे. सदर कारवाई औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक बालाजी ठाकूर, मधुकर मोरे, सुनील बोराडे, विष्णू पवार, सुभाष ठोके, गणेश मुसळे यांनी केली.

मोठ्या रॅकेटची शक्‍यता
शालेय पोषण आहारामध्ये मिळणारा तांदूळ व इतर वस्तू काळ्या बाजारात विकणारे मोठे रॅकेट गंगापूरमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, अशी चर्चा शहरात सुरू होती. यानिमित्ताने त्यावर प्रकाश पडला आहे.