व्हेरॉकचे नवीन वर्षात मिशन  ‘ब्राझील, मोरोक्को’

व्हेरॉकचे नवीन वर्षात मिशन  ‘ब्राझील, मोरोक्को’

औरंगाबाद - वर्ष १९९० मध्ये स्थापन झालेल्या आणि देशभरातील ऑटो कंपन्यांना विविध सुटे भाग पुरविणाऱ्या व्हेरॉक औद्योगिक समूहाने २०१८ या नव्या वर्षांत दक्षिण अमेरिका आणि उत्तर आफ्रिकेत पाऊल ठेवण्याचे ठरविले आहे. या देशातील नवे प्लान्ट २०१८ मध्ये पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील, अशी माहिती त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

औरंगाबादेत १९९० मध्ये स्थापन झालेल्या व्हेरॉक औद्योगिक समूहाने सत्तावीस वर्षांच्या कालावधीत जगाच्या पाठीवर आपली पाऊले रोवली आहेत. जगातील नामांकित आणि अव्वल ‘ऑटो पार्ट सप्लायर’ कंपन्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या व्हेरॉकचे बरेच कामकाज औरंगाबादेतून चालते. औरंगाबादच मुख्यालय असलेल्या या कंपनीचे जगातील बहुतांश ऑटो उद्योगांना वाहनांचे सुटे भाग पुरविणारी आणि वाहनांचे लाईटिंग सिस्टम तयार करणारी अग्रगण्य कंपनी असलेल्या व्हेरॉकची पाऊले आता दक्षिण अमेरिकेत पडली आहेत. या खंडातील सर्वात मोठे राष्ट्र असलेल्या ब्राझीलमध्ये २०१८ मध्ये व्हेरॉक आपला उद्योग सुरू करणार असल्याची माहिती व्हेरॉक समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन यांनी दिली. आफ्रिका खंडाच्या उत्तरेला असलेल्या मोरोक्कोमध्येही व्हेरॉक २०१८ मध्ये आपला उद्योग सुरू करणार असल्याचे तरंग जैन यांनी सांगितले. उत्पादन आणि संशोधनाचे काम येथे करण्यात येणार आहे. मोरोक्कोतील कंपन्या आणि दक्षिण युरोपीय राष्ट्रांमधील ऑटो उद्योगांसाठी येथे हा प्लान्ट सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी व्हेरॉक किती गुंतवणूक करणार, याबाबत मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.

औरंगाबादेत जन्माला आलो आणि वाढलो याचा व्हेरॉक समूहाला अभिमान आहे. येथे व्हेरॉकच्या दहापेक्षा अधिक कंपन्या आहेत आणि कंपनीची मुख्य उत्पादनेही येथेच तयार होतात. पॉलीमरसाठीचे संशोधन आणि विकास केंद्रे येथेच आहेत. कंपनी म्हणून आम्ही विस्तारत असताना यंदा २०१८ मध्ये मोरोक्को आणि दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये कारखाने सुरू होतील.  
- तरंग जैन, व्यवस्थापकीय संचालक, व्हेरॉक समूह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com